Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : जोरदार पावसाचा ११ जिल्ह्यांना अंदाज; कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार

Rain Update : अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज पुणे, सातारा, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

तर सिंधुदूर्ग, सांगली, नगर, छत्रपतील संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्याही सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच सिंधुदूर्ग, कोल्हापूर, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यता काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच नाशिक, नंदूरबार, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

शनिवारी कोकण आणि सातारा तसेच पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच कोल्हापूर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा तेसच विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT