Monsoon Forecast Agrowon
हवामान

July Rain Forecast: जुलैमध्येही दमदार सरी

Rain in Maharashtra: जून महिन्यात देशात सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायम राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अमोल कुटे

Pune News: जून महिन्यात देशात सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायम राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी सोमवारी (ता. ३०) जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक आहे. तर ईशान्य भारतातील राज्ये, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील नोंदीनुसार जूलै महिन्यात देशात २८०.४ मिलिमीटर पाऊस पडतो.

देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. लडाख, बिहार, पूर्वोत्तर राज्ये आणि दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मध्य भारत, उत्तर भारत वगळता देशभरात किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याचे तापमान सध्या सर्वसाधारण पातळीवर असून, तटस्थ स्थिती (एल-निनो नाही आणि ला-निना देखील नाही) कायम आहे. ही स्थिती हिवाळ्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. यातच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सध्या तटस्थ असून, मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात ‘आयओडी’ ऋण (निगेटिव्ह) स्थितीत जाण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद

यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास वेगाने झाल्याने जून महिन्यातच मॉन्सून देशात सर्वदूर पोहोचला आहे. यातच जून महिन्यात देशात १६५.३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा १८० मिलिमीटर पावसाची नोंद होत सरासरीपेक्षा अधिक (१०९ टक्के) पर्जन्यमान झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाना, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर राजधानी दिल्ली, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरूणाचल प्रदेश सरासरीपेक्षा कमी आणि महाराष्ट्रासह (१०६ टक्के) उर्वरित राज्यात सरासरी इतका पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT