Monsoon Rain Agrowon
हवामान

Paus Andaj: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Weather: राज्यातील काही भागात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, अशी शक्यताही हवामान विभागाने दिली. 

आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच सिंधुदूर्ग आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली. 

उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी होऊन उघडीप राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली. तर पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर, तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बुलडणा, अकोला, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

गुरुवारी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि नांदेड तर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहून हलक्या सरी पडतील. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहून ढगाळ हवामानाची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI in Sugarcane Farming: सुरु उसाला एआयची जोड देऊन उत्पादन कसे वाढवता येईल?

PoCRA Phase 2: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्यासाठी १०० कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर

Indigenous Variety: आईच्या जपवणुकीला मुलाच्या प्रयोगाची साथ; गावरान वाणाची राष्ट्रीय नोंद

Rural Development: ‘बीडीओं’नी आठवड्यात १० गावांना भेटी द्याव्यात

Shivendrasinghraje Bhosale: वार्षिक योजनेतील निधी अखर्चित ठेवू नका

SCROLL FOR NEXT