Heat Wave Agrowon
हवामान

Khandesh Heat : खानदेशात उष्णता वाढू लागली

Heat Wave : खानदेशात उष्णता सतत वाढ असून, कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. किमान तापमानही १३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उष्णता सतत वाढ असून, कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. किमान तापमानही १३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. गारठा कमी होत आहे. दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. यंदा थंडीचे प्रमाण अल्प होते. त्यात सलग थंडीचे दिवस अल्प होते. कारण डिसेंबर व या महिन्यातही ढगाळ, पावसाळी वातावरण होते.

यामुळे थंडी हवी तशी नव्हती. डिसेंबरमध्ये काही दिवस किमान तापमान सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. डिसेंबरच्या अखेरीस किंवा २५ ते २९ डिसेंबर याकालावधीत पाऊसही खानदेशात झाला. पावसाने नुकसान झाले. नंतर थंड वातावरण तयार झाले. पण काही दिवस थंडी होती.

या महिन्यात सुमारे आठ ते १० दिवस ढगाळ वातावरण होते. काही भागात तुरळक पाऊसही झाला. मागील तीन दिवसांपासून खानदेशात निरभ्र वातावरण आहे. पण थंडी गायब झाली आहे. ऊन तापू लागले आहे. दुपारी १२ ते चार या कालावधीत उष्णता अधिक असते. कमाल तापमान ३० अंश सेल्सीअसवरून ३३ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे.

कमाल तापमानाचा फटका रब्बीला बसू शकतो. कारण हरभरा अद्याप घाटे लागण्याच्या स्थितीत आहे. गहू निसवला आहे. दादर ज्वारीही निसवत आहे. या पिकांना थंडीची गरज आहे. सध्या सायंकाळी गारठा तयार होतो. पहाटेही गारठा असतो. परंतु दुपारी उष्णता वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या सिंचनासंबंधी बदल, सुधारणा केल्या आहेत.

केळी, कलिंगड, भाजीपाला, ऊस आदा पिके खानदेशात आहेत. तसेच पपई, रब्बी पिकांनाही सिंचन केले जात आहे. केळीला सध्या रोज दोन ते अडीच तास पाणी अनेक शेतकरी देत आहेत. मागील महिन्यात केळीला एक दिवसाआड पाणी दिले जात होते. वाफसा स्थिती कायम राखली जात होती. मोठ्या पिकांना पाण्याची अधिकची गरज आहे.

हिरवी नेट व वारा अवरोधकांबाबत कार्यवाही

अनेक शेतकरी कलिंगड, केळी, पपई आदी पिकांभोवती उष्ण, गारठा यापासून संरक्षणासंबंधी हिरवी नेट लावत आहेत. काही शेतकऱ्यांनी केळीभोवती उंच वाढणारे गवत, शेवरी आदींची पेरणी केली आहे.

यामुळे केळी, पपई, कलिंगडाला उष्णतेपासून संरक्षण मिळत आहे. सध्या पहाटे थंड व दुपारी उष्ण असे वातावरण राहत असल्याने पिकांना खते, फवारणी यातून संरक्षणासंबंधी, रोगराईपासून बचावासाठी शेतकरी कार्यवाही करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT