Weather Update Maharashtra Agrowon
हवामान

Weather Update Maharashtra : राज्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज

Maharashtra maximum temperature : राज्यात मागील २४ तासात सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तर जेऊर येथे तापमानाचा पार ३५.५ अंशावर आणि कोकणातील रत्नागिरी येथे ३५.७ अंशावर पोहचला आहे.

Dhananjay Sanap

Meteorological forecast : राज्यात पुढील पाच दिवस निरभ्र आकाशासह किमान तापमान कायम राहून मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होत आहे. तसेच पहाटेचा गारठा कमी होऊन दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. 

राज्यात मागील २४ तासात सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तर जेऊर येथे तापमानाचा पार ३५.५ अंशावर आणि कोकणातील रत्नागिरी येथे ३५.७ अंशावर पोहचला आहे. तर विदर्भात वाशिम जिल्ह्यात उच्चांकी ३४.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तर नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील निच्चांकी किमान १३.९ अंश तापमानची नोंद झाली.

इराण आणि लगतच्या भागात पश्चिमी चक्रावात निर्माण झाले आहेत. त्यामुळे उत्तर आणि पश्चिम भागात वाऱ्यांच्या प्रवाहात भिन्नता दिसत आहे. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत.

त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या तुरळक भागात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तर मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी दिवसा गारठा वाढण्याची शक्यता असून हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओरीसात धुक्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मागील २४ तासात विदर्भात किमान तापमान वाढलं आहे. तर राज्याच्या काही भागात तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाने जास्त आहे. राज्यातील काही भागात पुढील चार दिवसांत कमाल तापमानाचा पार २ ते ३ अंशाने वाढेल तर किमान तापमान कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT