High Temprature  Agrowon
हवामान

High Temprature : राज्यात उन्हाचा चटका वाढला ; विदर्भात पारा चाळिशीपार; काही ठिकाणी वादळी पाऊस

Weather News : सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने कमाल तापमान पुन्हा चाळिशीपार गेले आहे. बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Team Agrowon

Weather Forecast : पुणे : सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने कमाल तापमान पुन्हा चाळिशीपार गेले आहे. बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली. आज (ता. २७) राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्यात अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण छत्तीसगडपासून महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान झाल्याने मंगळवारी (ता. २५) सायंकाळनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड आणि पन्हाळा प्रत्येकी २० मिलिमीटर, सांगली येथे १० मिलिमीटर, तर साताऱ्यातील कराड येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बुधवारी (ता. २६) अकोलासह चंद्रपूर, जळगाव, अमरावती आणि ब्रह्मपुरी येथे तापमान ४० अंशांच्या वर होते. धुळे, जेऊर, मालेगाव, परभणी, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान असून, उकाडा जाणवत आहे. आज (ता. २७) राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.२---१९.९

अहिल्यानगर---निरंक---१६.५

धुळे---३९.५---१५.६

जळगाव---४०.३---१७.८

जेऊर---३९.५---१९.५

कोल्हापूर---३६.९---२१.६

महाबळेश्‍वर---३१.८---१८.१

मालेगाव---३९.२---२०.६

नाशिक---३७.६---१९.६

सांगली---३७.३---२१.०

सातारा---३७.४---२१.४

सोलापूर---३८.९---२४.४

सांताक्रूझ---३३.५---२३.५

डहाणू---३३.८---२२.२

रत्नागिरी---३३.२---२४.७

छत्रपती संभाजीनगर---३८.२---१९.४

धाराशिव---३७.७---२१.६

परभणी---३९.६---२१.०

परभणी (कृषी)---३८.६---१६.४

अकोला---४१.४---२०.३

अमरावती---४०.२---२०.०

भंडारा---३७.६---१९.०

बुलडाणा---३७.६---२२.०

ब्रह्मपुरी---४०.२---१९.१

चंद्रपूर---४०.४---निरंक

गडचिरोली---३८.४---१८.६

गोंदिया---३७.६---१७.४

नागपूर---३८.४---१८.०

वर्धा---३९.५---१८.९

वाशीम---३९.४---निरंक

यवतमाळ---३९.४---२०.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१७.४---४१.४

मराठवाडा---१६.४---३९.६

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.१---३९.५

उत्तर महाराष्ट्र---१५.६---४०.३

कोकण---२२.२---३३.८

४० अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४१.४, चंद्रपूर ४०.४, जळगाव ४०.३, अमरावती ४०.२, ब्रह्मपुरी ४०.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT