Weather Prediction Agrowon
हवामान

Maharashtra Weather: राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये उष्णतेत वाढ; काही ठिकाणी हलका पावसाचा अंदाज

Heatwave Alert: महाराष्ट्रात उष्णतेचा पारा वाढत असून, काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता असतानाच, काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तर काही भागात पावसाचाही अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पाऊस आणि बहुतांशी भागात उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. 

हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यात उष्णता वाढण्याचा अंदाज दिला. काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही देण्यात आला.

नांदेड जिल्ह्यात आज आणि सोमवारी हलक्या पावसाचीही शक्यता आहे. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या आणि मध्य पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

सोलापूर जिल्ह्यात पुढील ४ दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असून सोमवारी काही ठिकाणी हलक्या सरी पडतील. सांगली जिल्ह्यात आज आणि सोमवारी पावसाचा अंदाज आहे, तर रविवारी उष्णता वाढण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि सोमवारी हलक्या सरी पडतील. तसेच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला.

धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण तसेच दमट हवामानचा अंदाजही हवामान विभागाने दिला. कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज आणि सोमवारी तर रत्नागिरी जिल्ह्यात आज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT