Heat Wave  Agrowon
हवामान

Heat Wave : कोकणात उष्णतेची लाट ; राज्यात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Weather News : सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Team Agrowon

High Temprature : पुणे : सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील सांताक्रूझ आणि रत्नागिरी येथे उष्णतेची लाट आली होती. आज (ता. १३) राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.  

बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राजस्थानातील भूज येथे देशातील उच्चांकी ४२.२ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अकोलासह धुळे, सांताक्रूझ, रत्नागिरी, ब्रह्मपुरी येथे तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पार होते. किनारपट्टीय भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली किंवा तापमान ३७.५ अंशांच्या पुढे गेले तर उष्णतेची लाट आली असे समजले जाते. त्यानुसार सांताक्रूझ, रत्नागिरी येथे उष्णतेची लाट आली होती.

दरम्यान सोलापूर, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, वर्धा येथे कमाल तापमान ३८ अंशांपार होते. तर जेऊर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, नागपूर, वाशीम, आणि यवतमाळ येथे ३७ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत असून, उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.  

उन्हाळा वाढताच किमान तापमानात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी (ता. १२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १५.८ अंशांची नोंद झाली. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल ११ ते २१ अंशांपर्यंत तफावत आहे. आज (ता. १३) राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहून, उन्हाचा चटका तापदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

३८ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : अकोला ३९.५, रत्नागिरी ३९.४, ब्रह्मपुरी ३९.४, सांताक्रूझ ३९.२, धुळे ३९, सोलापूर ३८.६, जळगाव ३८.४, अमरावती ३८.४, चंद्रपूर ३८.२, वर्धा ३८.

बुधवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---३६.०---१८.१
अहिल्यानगर---निरंक---१७.४
धुळे---३९.०---१६.२
जळगाव---३८.४---१८.६
जेऊर---३७.५---१८.०
कोल्हापूर---३५.२---२२.१

महाबळेश्‍वर---३०.६---१९.६
मालेगाव---निरंक---२०.४
नाशिक---३७.५---१९.४
निफाड---३६.४---१५.८
सांगली---निरंक---२३.५
सातारा---३६.४---१९.०
सोलापूर---३८.६---२३.२
सांताक्रूझ---३९.२---२३.४
डहाणू---३६.०---२२.७
रत्नागिरी---३९.४---२३.५
छत्रपती संभाजीनगर---३७.४---२१.४
धाराशिव---३६.८---१९.४
परभणी---निरंक---२०.२
परभणी (कृषी)---३६.०---१६.३
अकोला---३९.५---२१.७

अमरावती---३८.४---२०.७
भंडारा---३७.०---२३.४
बुलडाणा---३७.०---२३.४
ब्रह्मपुरी---३९.४---१८.२
चंद्रपूर---३८.२---निरंक
गडचिरोली---३७.२---१८.६
गोंदिया---३६.२---१७.२
नागपूर---३७.६---१९.२
वर्धा---३८.०---२१.५
वाशीम---३७.८---निरंक
यवतमाळ---३७.४---२२.५


सरासरी तापमान (अंश से.)
विभाग---किमान---कमाल
विदर्भ---१७.२---३९.५
मराठवाडा---१६.३---३७.४
पश्‍चिम महाराष्ट्र---१८.२---३९.०
उत्तर महाराष्ट्र---१५.८---३७.२
कोकण---२२.७---३९.४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT