Heat Wave  Agrowon
हवामान

Vidarbha Heat Wave : विदर्भात उष्णतेची लाट कायम

Summer Heat : सूर्य तळपल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असतानाच, शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती.

अमोल कुटे

Pune News : सूर्य तळपल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असतानाच, शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती. चंद्रपूर येथे राज्याच्या उच्चांकी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १६) विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याचा, राज्यात उन्हाची ताप वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ओडिशातील झर्सुगुडा येथे देशातील उच्चांकी ४१.८ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात चंद्रपूर पाठोपाठ ब्रह्मपूरी, सोलापूर आणि वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

अकोला, अमरावती, नागपूर, मालेगाव आणि यवतमाळ येथे तापमान चाळीशीपार होते. कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपार गेल्याने तसेच तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंश व त्यापेक्षा अधिक वाढ झाल्याने अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर आणि यवतमाळ येथे उष्णतेची लाट आली होती.

दरम्यान धुळे, जेऊर, सांगली, सातारा, परभणी, भंडारा, गडचिरोली आणि वाशीम येथे कमाल तापमान ३९ अंशांपार होते. राज्यात उन्हाच्या चटका असह्य होऊ लागला असून, उकाड्यात वाढ झाल्याने चांगलाच घामाच्या धारा वाहत आहेत. आज (ता. १६) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.७---१७.३

अहिल्यानगर---निरंक---१८.५

धुळे---३९.५---१४.२

जळगाव---निरंक---१७.६

जेऊर---३९.५---१९.५

कोल्हापूर---३७.९---२३.७

महाबळेश्वर---३२.४---१९.८

मालेगाव---४०.२---२१.८

नाशिक---३६.३---१७.४

निफाड---३६.९---१२.८

सांगली---३९.२---२४.०

सातारा---३७.९---२१.४

सोलापूर---४१.१---२४.६

सांताक्रूझ---३४.५---२३.०

डहाणू---३५.०---२१.०

रत्नागिरी---३३.०---२४.०

छत्रपती संभाजीनगर---३८.७---२१.६

धाराशिव---३८.६---२२.०

परभणी---३९.८---२२.६

परभणी (कृषी)---३८.९---१९.८

अकोला---४०.९---२१.२

अमरावती---४०.६---२०.७

भंडारा---३९.०---२०.०

बुलढाणा---३७.६---२४.४

ब्रह्मपूरी---४१.२---२१.०

चंद्रपूर---४१.४---निरंक

गडचिरोली---३९.४---१९.८

गोंदिया---३७.६---१९.२

नागपूर---४०.४---२०.२

वर्धा---४१.०---२१.०

वाशीम---३९.८---निरंक

यवतमाळ---४०.०---२१.६

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१९.२---४१.४

मराठवाडा---१९.८---३९.८

पश्चिम महाराष्ट्र---१७.३---४१.१

उत्तर महाराष्ट्र---१२.८---४०.२

कोकण---२१.०---३५.०

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT