Heat Wave  Agrowon
हवामान

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका वाढला; विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम

Summer Heat : उन्हामुळे दुपारी घराबाहेर निघणे मुश्किल होत आहे. राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांशी भागात दुपारचे तापमान ४० शी पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

अनिल जाधव

Pune News : उन्हामुळे दुपारी घराबाहेर निघणे मुश्किल होत आहे. राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांशी भागात दुपारचे तापमान ४० शी पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर अनेक ठिकाणी तापमान ४० अंशाच्या पुढे सरकले आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

दक्षिण महाराष्ट्रात आज काही भागात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही हवामान विभागाने दिला.

विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच चढला. आज अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर उद्या यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागूपर, वर्धा, यवतमाळ, मालेगाव आणि सोलापूर जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार पोचले. राज्यात वाढत्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. राज्यातील तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT