Weather Agrowon
हवामान

Maharashtra Temperature: उन्हाच्या झळा वाढल्या; तापमानात सतत वाढ

Hot Weather Update: राज्यात उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, अकोला येथे तापमान ३७.८ अंशांवर पोहोचले आहे. सोलापूर, सांगलीसह अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या वर गेल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अकोला येथे तापमानाचा पारा ३७.८ अंशांवर पोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३६ अंशांच्या पार असल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. राज्याच्या तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वारे निवळून गेले आहे. देशातील कमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. बुधवारी (ता. १९) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्याच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, जेऊर, सांगली, ब्रह्मपुरी, वाशीम येथे तापमान ३७ अंशांच्या वर होते. तर परभणी, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे किमाल तापमान ३६ अंशांपार पोचले होते. उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असून, उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. २०) कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३५.८---१४.९

अहिल्यानगर---३५.०---१५.४

धुळे---३४.०---१४.०

जळगाव---३४.४---१५.५

जेऊर---३७.०---१६.५

कोल्हापूर---३५.१---२०.०

महाबळेश्वर---३१.४---१७.२

मालेगाव---३५.२---१६.४

नाशिक---३५.७---१५.४

निफाड---३२.०---१०.०

सांगली---३७.१---२०.१

सातारा---३५.३---१७.४

सोलापूर---३७.५---२०.८

सांताक्रूझ---३५.९---२०.०

डहाणू---३३.०---१९.७

रत्नागिरी---३२.९---२१.५

छत्रपती संभाजीनगर---३५.७---१९.६

धाराशिव---३४.७---१८.१

परभणी---३६.५---१८.६

परभणी (कृषी)---३६.५---१८.६

अकोला---३७.८---१८.६

अमरावती---३६.४---१५.५

भंडारा---३४.६---१९.०

बुलडाणा---३४.८---१९.६

ब्रह्मपुरी---३७.२---१७.९

चंद्रपूर---३६.०---निरंक

गडचिरोली---३५.०---१६.६

गोंदिया---३४.०---१६.८

नागपूर---३५.४---१८.०

वर्धा---३६.०---१९.६

वाशीम---३७.०---निरंक

यवतमाळ---३६.०---१७.४

३७ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ३७.८, सोलापूर ३७.५, ब्रह्मपुरी ३७.२, सांगली ३७.१,

जेऊर ३७, वाशीम ३७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT