Heat Wave
Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Team Agrowon

Summer Season Update Pune : राज्यात उन्हाची ताप वाढल्याने चटका असह्य होत आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे देशातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

यंदाच्या हंगामाचे राज्यातील हे सर्वोच्च तापमान ठरले आहे. आज (ता. १३) राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कमाल तापमानाचा पारा ४० अंशापार गेला असेल आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशापेक्षा अधिक वाढ झाली असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उष्ण लाट आली होती.

धुळे येथे ४३.६, अकोला आणि वर्धा येथे ४३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ लगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून दक्षिण आंध्र प्रदेशापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

आज (ता. १३) राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याबरोबरच, दमट आणि उष्ण हवामान अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ४१.७ (२३.४), जळगाव ४४.८ (२७.५), धुळे ४३.६, कोल्हापूर ३७.१ (२५), महाबळेश्वर ३३.५ (२०.४), नाशिक ४०.७ (२३.४),

निफाड ४१.८ (२३.८), सांगली ३८.५ (२४.९), सातारा ३९.३ (२३.६), सोलापूर ४१.५ (२७.५), सांताक्रूझ ३३.९ (२८), डहाणू ३६.२ (२७.५), रत्नागिरी ३४.८ (२७.७),

छत्रपती संभाजीनगर ४१.४ (२२), नांदेड - (२४), परभणी ४२.६ (२६.५), अकोला ४३ (२४.४), अमरावती ४१.४ (२१.९), बुलडाणा ४१ (२५.२), ब्रह्मपुरी ४१.२ (२२.४),

चंद्रपूर ४१.२, गडचिरोली ४०.४(२४.२), गोंदिया ४१ (१९.८), नागपूर ४१.३ (२१), वर्धा ४३ (२२.६), वाशीम ४०.६ (२३.८), यवतमाळ ४१ (२२.५).

उष्ण लाटेचा इशारा

विदर्भ : वर्धा, अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT