Summer Weather Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave: कोकणात उष्ण लाटेचा इशारा; रत्नागिरी येथे ३८.९ अंश तापमानाची नोंद

Summer Heat: कोकणात उन्हाचा कडाका वाढला असून, रत्नागिरीत तब्बल ३८.९ अंश तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने कोकणातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण लाटेचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे, तर उर्वरित राज्यातही उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात उन्हाळ्याची सुरुवात झाल्याने दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत आहे. कोकणात तापमानाचा पारा ३८ अंशांपार पोहोचल्याने उष्णतेची लाट आली आहे. मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे ३८.९ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. २६) कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशातील कमाल तापमानात वाढ होत असून, मंगळवारी (ता. २५) आंध्र प्रदेशातील कर्नुल येथे देशातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील रत्नागिरी येथे ३८.९, तर सांताक्रूझ येथे ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किनारपट्टीय भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली किंवा तापमान ३७.५ अंशांच्या पुढे गेले तर उष्णतेची लाट आली असे समजले जाते. त्यानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे.

दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, जेऊर, सातारा, विदर्भातील अकोला, यवतमाळ, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तापमान ३६ अंशांच्यावर होते. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाड्याने घामाच्या धारा वाहत आहेत. उत्तर महाराष्ट्रासह पहाटे काहीसा थंडावा कायम आहे.

मंगळवारी (ता. २५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.आज (ता. २६) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण लाटेचा इशारा असल्याने सतर्कतेचा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---३५.---१४.६
अहिल्यानगर---३४.८---१२.७
धुळे---३४---१२
जळगाव---३४.८---१२.८
जेऊर---३६.५---१५.५

कोल्हापूर---३४.४---२०.३
महाबळेश्‍वर---३०.२---१६.९
मालेगाव---३३.६---१६.६
नाशिक---३३.८---१५.७
निफाड---३३---११.४
सांगली---३६.६---१९.९
सातारा---३६---१७
सोलापूर---३७.६---१९.४

सांताक्रूझ---३८.४---२५.४
डहाणू---३४.४---२०.४
रत्नागिरी---३८.९---२१.५
छत्रपती संभाजीनगर---३५.२---१७.५
धाराशिव---३४.६---१७.१
परभणी---३५.०---१५.९
परभणी (कृषी)---३५---१२.५
अकोला---३६.४---१९.८

अमरावती---३४.८---१८.७
भंडारा---३४---१७.२
बुलडाणा---३४---१७.२
ब्रह्मपुरी---३६.९---१६.४
चंद्रपूर---३६---निरंक
गडचिरोली---३५---१७
गोंदिया---३२.८---१५.८
नागपूर---३४.१---१७.६
वर्धा---३४.५---१६.५
वाशीम---३५.६---निरंक
यवतमाळ---३६.२---१९.२

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) : सिंधुदुर्ग.

३६ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

रत्नागिरी ३८.९, सांताक्रूझ ३८.४, सोलापूर ३७.६, ब्रह्मपुरी ३६.९, सांगली ३६.६, जेऊर ३६.५, अकोला ३६.४, यवतमाळ ३६.२, सातारा ३६, चंद्रपूर ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT