Summer Heat Agrowon
हवामान

Heat Wave : कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढल्याने अनेक ठिकाणी कमाल तापमान पुन्हा चाळशीपार गेले आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढल्याने अनेक ठिकाणी कमाल तापमान पुन्हा चाळशीपार गेले आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) मुंबईसह कोकणात उष्ण लाटेचा इशारा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा, तसेच उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. मराठवाड्यापासून उत्तर कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात ढगाळ हवामान झाले असून, आज (ता. १७) मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार पोचला आहे. किनारपट्टीय भागात कमाल तापमान ३७ अंशाच्या वर असेल आणि सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट समजली जाते. त्यानुसार मुंबईतील सांताक्रुझ येथे उष्ण लाट आली आहे. आज (ता. १७) कोकणात उष्ण लाटेचा इशारा, तर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ४०.१, धुळे ४०.०, नगर ४०.८, जळगाव ४१.५, कोल्हापूर ३९.१, महाबळेश्वर ३३.०, मालेगाव ४२.६, नाशिक ४०.४, निफाड ३९.१, सांगली ३९.६, सातारा ४०.१, सोलापूर ४०.६, सांताक्रूझ ३७.९, डहाणू ३५.६, रत्नागिरी ३४.२,

छत्रपती संभाजीनगर ३९.३, नांदेड ३८.६, धाराशिव ३९.५, परभणी ३९.५, अकोला ४१.०, अमरावती ३९.४, बुलढाणा ३९.८, ब्रह्मपूरी ३९.८, चंद्रपूर ४०.०, गडचिरोली ३८.४, गोंदिया ३७.९, नागपूर ३७.८, वर्धा ३९.५, वाशीम ४०.६, यवतमाळ ३९.५.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

उष्ण रात्रीचा इशारा ( येलो अलर्ट) :

पुणे, सोलापूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पुणे, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

मालेगाव ४२.६, जळगाव ४१.५, अकोला ४१.०, नगर ४०.८, सोलापूर ४०.६, वाशीम ४०.६, नाशिक ४०.४, सातारा ४०.१, पुणे ४०.१, धुळे ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT