Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

Heat Wave : सूर्य तळपल्याने राज्यात होरपळ वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातील मालेगाव आणि जेऊर येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : सूर्य तळपल्याने राज्यात होरपळ वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातील मालेगाव आणि जेऊर येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा, उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

आग्नेय मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा, ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, उकाडा देखील वाढला आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव आणि जेऊर येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यापूर्वी याच महिन्यात १९ एप्रिल रोजी अकोला येथे ४४ अंश तापमान नोंदले गेले होते.

दरम्यान, उन्हाचा चटका कायम असल्याने, जळगाव, वाशीम येथे ४३ अंश तर सोलापूर, नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी येथे पारा ४२ अंशांवर आहे. आज (ता. १) कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण लाटेचा तसेच उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ४१.८, धुळे ४१.५, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३९.४, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४४.०, नाशिक ३९.४, निफाड ४०.०, सांगली ४१.०, सातारा ४०.७, सोलापूर ४२.९, सांताक्रूझ ३९.१, डहाणू ३६.४, रत्नागिरी ३५.०, छत्रपती संभाजीनगर ४१.४, नांदेड ४२.८, परभणी ४०.८, अकोला ४२.३, अमरावती ४०.४, बुलडाणा ४०.४, ब्रह्मपुरी ४२.०, चंद्रपूर ४१.८, गडचिरोली ४०.२, गोंदिया ३८.२, नागपूर ४०.१, वर्धा ४१.०, वाशीम ४३.०, यवतमाळ ४१.२.

उष्ण लाट, उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

मालेगाव ४४, जेऊर ४४, जळगाव ४३.४, वाशीम ४३, सोलापूर ४२.९, नांदेड ४२.८, अकोला ४२.३, ब्रह्मपुरी ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT