Weather Agrowon
हवामान

Rain Forecast: राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता; मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Rain Alert: राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून, काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा जाणवणार आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यातील तुरळक ठिकाणी हजेरी लावल्यानंतर वादळी पावसाचे ढग दूर होण्याचे संकेत आहेत. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज (ता. २३) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आग्नेय उत्तर प्रदेशापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा छत्तीसगडमधील चक्राकार वाऱ्यात मिसळून गेला आहे. यातच बंगालच्या उपसागरात केंद्र भागाकडून बाहेरच्या दिशेने वारे फिरणारी प्रणाली (एन्टी सायक्लोन) असल्याने पूर्व आणि मध्य भारतात वाऱ्यांचा संगम होत आहे. या प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. शनिवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले.

सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा, धाराशिव, ब्रह्मपुरी, नागपूर, परभणी, जेऊर, अमरावती येथे तापमान ३८ अंशांच्या वर होते.
धुळे, कोल्हापूर, सांगली, परभणी, अकोला, भंडारा, चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने उकाडा कायम आहे.

आज (ता. २३) मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---३६.८---१५.४
अहिल्यानगर---निरंक---१५.५
धुळे---३७.०---१५.८
जळगाव---३५.८---२०.२
जेऊर---३८.०---१८.०
कोल्हापूर---३७.०---२२.७

महाबळेश्वर---३१.७---१६.६
मालेगाव---३६.०---१७.८
नाशिक---३४.७---१६.०
निफाड---३४.७---१०.२
सांगली---३७.४---२१.०
सातारा---३६.७---१८.४
सोलापूर---३८.८---२३.०

सांताक्रूझ---३४.०---२१.९
डहाणू---३३.३---२०.५
रत्नागिरी---३५.०---२२.८
छत्रपती संभाजीनगर---३५.२---२०.६
धाराशिव---३८.२---२०.४
परभणी---३८.१---२०.५

परभणी (कृषी)---३७.२---१७.०
अकोला---३७.७---२०.८
अमरावती---३८.०---१९.५
भंडारा---३७.०---२१.०
बुलडाणा---३३.५---२१.६
ब्रह्मपुरी---३८.२---२०.४

चंद्रपूर---३७.२---निरंक
गडचिरोली---३५.०---२०.४
गोंदिया---३५.२---२०.६
नागपूर---३८.२---१९.८
वर्धा---३८.५---२०.९
वाशीम---३७.६---निरंक
यवतमाळ---३७.८---२२.४

सरासरी तापमान (अंश से.)
विभाग---किमान---कमाल
विदर्भ---१९.८---३८.५
मराठवाडा---१७.०---३८.२

पश्‍चिम महाराष्ट्र---१५.४---३८.८
उत्तर महाराष्ट्र---१०.२---३७.०
कोकण---२०.५---३५.०

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

३८ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :
सोलापूर ३८.८, वर्धा ३८.५, धाराशिव ३८.२, ब्रह्मपुरी ३८.२, नागपूर ३८.२, परभणी ३८.१, जेऊर ३८, अमरावती ३८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT