Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: महाराष्ट्रात उष्णतेचा वणवा, विदर्भ-मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

IMD Forecast: राज्यातील नंदूरबार येथे ४६.५ अंश तापमान नोंदवत यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने राज्यात तापमानाचा वणवा पेटला आहे. उष्ण झळांनी अंगाची काहिली होत आहे. नंदूरबार कृषी विज्ञान केंद्रात राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १२) विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम आहे.

पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, पश्चिम राजस्थानपासून उत्तर विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणालींमुळे विदर्भात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ आकाश आहे.

शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नंदूरबार कृषी विज्ञान केंद्रात देशातील उच्चांकी ४६.५ अंश तापमानाची नोंद झाली. अकोला येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तर मालेगाव, चंद्रपूर, अमरावती, धुळे, जळगाव आणि नागपूर येथे ४२ अंशांपेक्षा अधिक, तसेच छत्रपती संभाजीनगर, परभणी, भंडारा, गडचिरोली, वाशीम आणि यवतमाळ येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात काही अंशी वाढ-घट होत असली तरी उन्हाचा चटका कायम आहे.

आज (ता. १२) मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. ११) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३९.७---२०.५

अहिल्यानगर---निरंक---२२.५

धुळे---४२.०---१९.०

जळगाव---४२.०---२५.२

जेऊर---४०.०---२३.०

कोल्हापूर---३५.३---२३.३

महाबळेश्वर---३०.८---१८.१

मालेगाव---४२.८---२४.२

नाशिक---३९.७---२०.५

निफाड---४०.६---१८.६

नंदूरबार---४६.५---२३.२

सांगली---३६.९---२३.८

सातारा---३९.२---२१.७

सोलापूर---३९.४---२६.३

सांताक्रूझ---३३.८---२५.६

डहाणू---३६.३---२३.९

रत्नागिरी---३२.८---२५.८

छत्रपती संभाजीनगर---४१.४---२५.६

धाराशिव---३९.०---२३.६

परभणी---४१.५---२४.५

परभणी (कृषी)---४०.५---२०.१

अकोला---४३.५---२६.९

अमरावती---४२.४---२३.३

भंडारा---४१.४---२०.०

बुलडाणा---४०.०---२६.५

चंद्रपूर---४२.६---निरंक

गडचिरोली---४१.२---२२.०

गोंदिया---३९.४---२३.६

नागपूर---४२.०---२२.४

वर्धा---४०.५---२३.८

वाशीम---४१.४---निरंक

यवतमाळ---४१.२---२५.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.०---४३.५

मराठवाडा---२०.१---४१.५

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.१---३९.७

उत्तर महाराष्ट्र---१८.६---४२.८

कोकण---२३.९---३६.३

४२ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

नंदूरबार ४६.५, अकोला ४३.५, मालेगाव ४२.८, चंद्रपूर ४२.६, अमरावती ४२.४, धुळे ४२, जळगाव ४२, नागपूर ४२.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT