Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्राला पुन्हा हुडहुडी

Winter Update : अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे.

अमोल कुटे

Pune News : अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर पोचला असून, ६.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. आज (ता. २३) मध्य महाराष्ट्रासह राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. सोमवारी (ता. २२) मध्य प्रदेशातील दातीया यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात किमान तापमान ३ ते ७ अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही हवामान स्थिती कायम आहे.

उत्तर कोकण आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे.

उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. यापूर्वी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १६ जानेवारी रोजी ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. सोमवारी (ता. २२) निफाड येथे ८.८, तर जळगाव येथे ९ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होत गारठा वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.७ (१२.१), धुळे २७.० (६.३), जळगाव २७.७ (९.०), कोल्हापूर ३१.१ (१७.१), महाबळेश्वर २६.२ (१३.५), नाशिक २७.६ (११.६), निफाड २८.१ (८.८), सांगली ३१.६ (१७.७), सातारा ३१.२ (१४.५), सोलापूर ३३.६(१७.६), सांताक्रूझ २८.६ (१२.६), डहाणू २९.३ (१६.५), रत्नागिरी ३०.५ (१७.८),

छत्रपती संभाजीनगर २८.५ (११.५), नांदेड २९.४ (१६.६), परभणी २९.३ (१४.८), अकोला २९.४ (१२.८), अमरावती २८.६ (१४.३), बुलडाणा २७.० (१२.४), ब्रह्मपुरी २९.० (१७.१), चंद्रपूर ३०.० (१६.०), गडचिरोली २८.२ (१४.२), गोंदिया २५.२ (१२.९), नागपूर २७.६(१४.४), वर्धा २९.५(१५.५), वाशीम २९.४ (१२.४), यवतमाळ ३०.५ (१५.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT