Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पाच जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस काही भागात पाऊस, ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचा चटका राहण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस काही भागात पाऊस, ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचा चटका राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. 

हवामान विभागाने आज विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी गारपीट आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

तसेच बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात तसेच मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला.

उद्याही विदर्भातील बुलडाणा, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी गारपीट आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच अकोला अमरावती, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात तसेच मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला. 

गुरुवारी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी पडतील, असा अंदाज दिला. तर शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT