Hailstorm In Washim Agrowon
हवामान

Hailstorm In Washim : कारखेडा, वरोली परिसरात गारपीट

Unseasonal Rain : मानोरा शहरासह तालुक्यात दुपारपासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाळ पिकांसह फळबाग व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Team Agrowon

Washim Crop Damage News : मानोरा शहरासह तालुक्यात दुपारपासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) उन्हाळ पिकांसह फळबाग व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले.

मंगळवारी (ता. २५) दुपारी १२ वाजता आभाळ दाटून आला होता. हवेचा गारवा निर्माण झाल्याने दुपारी २ वाजतापासून विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

तालुक्यातील कार्ली, इन्झोरी, सोयजना, धानोरा घाडगे, वरोली, कारखेडा, सेवादासनगर, गादेगाव, चिखली परिसरात गारपिटीचा सडा पडला. तर संपूर्ण तालुक्यात सार्वत्रिक अवकाळी पावसाने हजेरी लावली.

सतत दोन ते तीन तास पडलेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांसह फळबाग व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .

गारपिटीच्या तडाख्याने वरोली येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतातील बाजरी व कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पिडीत शेतकऱ्याने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

शहरात दुपारी मोठ्या प्रमाणात पाऊस, गारपीट शहरात दुपारी ४ वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस,गारपीट आल्याने रस्तावारील लहान व्यापाऱ्याची एकच खडबड उळाली.

तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे. नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT