Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Unseasonal Rain : आजही गारपीट, वादळी पावसाचा इशारा; राज्यातील पिकांना मोठा तडाखा!

Maharashtra Weather Forecast : राज्यातील काही भागात पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिला. तर उद्यापासून पावसाचे वातावरण निवळेल आणि थंडीला पुन्हा सुरुवात होईल, असाही अंदाज आहे.

हवामान विभागाने आज गोंदीया जिल्ह्यात काही ठइकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उद्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

खानदेशात गारपीट आणि वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. खानदेशात सुमारे पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान यावल व रावेरमध्ये झाले. झाली आहे. तसेच जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा, धुळ्यातील धुळे, शिरपूर, नंदुरबारातील शहादा, नंदुरबारातही मोठे नुकसान झाले. रावेर, यावल तालुक्यांत केळी बागा जमीनदोस्त झाल्या तर गहू, मका, हरभरा, कलिंगड, पपई व अन्य भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला.

नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. नाशिमधील निफाड, देवळा आणि सिन्नर तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला. पावसाने कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष आणि डाळिंब पिकांना फटका बसला.

वादळी पावसाने पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात हजेरी लावली. विदर्भातील बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अमरावती, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT