Weather Update Agrowon
हवामान

Hailstorm Forecast : विदर्भात गारपिटीचा इशारा

राज्याच्या तापमानात घट झाल्याने पारा चाळीशीच्या खाली घसरला आहे. उन्हाचा चटका कायम असून, पावसाला पोषक वातावरण होत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune राज्याच्या तापमानात घट झाल्याने पारा चाळीशीच्या खाली घसरला आहे. उन्हाचा चटका कायम असून, पावसाला पोषक वातावरण होत आहे. आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे.

तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट (Hailstorm) होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

राज्यात उन्हाच्या झळा कायम असल्यातरी कमाल तापमानात घट झाली आहे. ४३ अंशांपर्यंत पोचलेले तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे.

रविवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३२ ते ३९ अंशांच्या दरम्यान आहे. राज्याच्या अनेर भागात उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. दक्षिण छत्तीसगडपासून, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात आज आणि उद्या (ता. २५) गारपिट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.१ (१८.२), जळगाव ३८.५ (२१.०), कोल्हापूर ३६.७ (२१.०), महाबळेश्वर ३०.१ (१५.४), नाशिक ३४.२(१९.५),

निफाड ३७.०(२१.०), सांगली ३७.८ (२०.६), सातारा ३६.१ (१७.५), सोलापूर ३८.८ (२३.९), सांताक्रूझ ३१.९ (२४.०), डहाणू ३२.६ (२४.६), रत्नागिरी ३३.१ (२३.५),

छत्रपती संभाजीनगर ३५.८ (२०.८), नांदेड ३७.६ (२३.६), परभणी ३८.५ (२३.०), अकोला ३९.३ (२२.५), अमरावती ३७.२(२१.३), बुलढाणा ३६.० (२१.६), ब्रह्मपूरी ३९.४ (२०.४),

चंद्रपूर ३९.४ (२०.४), गडचिरोली ३५.८(२१.२), गोंदिया ३७.४ (२१.७), नागपूर ३७.० (१९.४), वर्धा ३८.४(२०.६), यवतमाळ ३७.५ (२०.५).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : बीड, धाराशिव, परभणी, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT