Rain Forecast Agrowon
हवामान

Paus Andaj: आठ जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यात ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच ८ जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीचाही अंदाज देण्यात आला. राज्यात उन्हाचा चटकाही कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ, गडचिरोली चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तर अकोला, बुलडाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया जिल्ह्यात तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज आहे. यावेळी वादळी वारेही राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ५ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. यावेळी वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे. हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर खानदेशातील जळगाव, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यातही पुढील ३ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात गारपीटीचीही शक्यता आहे. 

सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी पुढील ३ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात उन्हाचा चटकाही कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT