Weather Agrowon
हवामान

Rain Alert: विदर्भातील ३ जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील बहुतांशी भागात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Alert: राज्यात पुढील काही दिवस वादळी पावसाचा प्रभाव दिसणार आहे. विदर्भातील काही भागांत गारपीट होण्याची शक्यता असून कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील अनेक भागात आजही वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील ३ जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीचा शक्यता आहे. पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे तर कोकणात शनिवारपासून उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला.

विदर्भातील चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपीटीची शक्यता आहे. तर यावेळी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील बुलडणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. यावेळी जोरदार वारेही वाहतील, असाही इशारा हवामान विभागाने दिला.

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज आणि उद्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात ४ दिवस पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 

मध्य महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक हवामान आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ४ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या तसेच धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातही आज काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात आज तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावासाचा अंदाज आहे. तर कोकणात शनिवारपासून उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT