Rain Agrowon
हवामान

Unseasonal Rain: राज्यात काही ठिकाणी गारपीटीचा इशारा; अवकाळी पावसासाठी ५ दिवस पोषक हवामान

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बदलणार असून, काही भागांत अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला पोषक वातावरण होत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही व्यक्त केली. 

हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात आजपासून ५ दिवस तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी सोमवार, मंगळवार आणि बुधवारी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी जोरदार वारेही वाहतील. 

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही सोमवारपासून तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी गारपीटीची शक्यताही जाणवत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्येही जोरदार वारे वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. पुणे जिल्ह्यात रविवारपासून बुधवापर्यंत काही भागात आवकाळी पावसाचा अंदाज आहे. 

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात आजपासून बुधवारपर्यंत विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली. 

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवार आणि बुधवारी विजा आणि ढगांच्या गडगाडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर दोन्ही दिवस या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीचाही इशारा हवामान विभागाने दिला. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातही पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्यात बुधवारी काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे. 

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT