Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपीटीचा इशारा; राज्यातील सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाचीही शक्यता

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात वादळी पावसाचे वातावरण कायम असून अनेक भागांत गारपीटीसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात वादळी पावसाचे वातावरण कायम आहे. आज राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटाचाही इशारा हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर यावेळी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असा अंदाज आहे. तर अमरावती, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यात उद्या आणि गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी गारपीटीचा अंदाज आहे. तसेच सुसाट्याचा वाराही राहील, असा इशाराही हवामान विभागाने दिला.

कोकणात आज आणि उद्या काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात आज तसेच गुरुवार आणि शुक्रवारी वादळी पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जिल्ह्यात पुढील ५ दिवस तर कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तीन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पुढील ३ दिवस तर लातूर, धाराशिव जिल्ह्यात ५ दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT