Thunderstorm Agrowon
हवामान

Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा

Orange Alert Maharashtra: राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान तयार झाले असून, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात आज (ता. ७) वादळी पावसासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: पावसाला पोषक हवामान झाल्याने तापमानात घट होत आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎दक्षिण तेलंगण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून, रायलसीमा, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे देशातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ आकाश होत असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली आहे.

‎‎मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश तापमानाची नोंद झाली. ‎अकोला, ‎सोलापूर आणि परभणी येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎‎धुळे, ‎जेऊर, ‎धाराशिव, ‎‎ब्रह्मपुरी, ‎चंद्रपूर, यवतमाळ येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे तापमानात घट होत आहे.

आज (ता. ७) जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदूरबार, सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎मंगळवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३८.२---२३.३

‎‎धुळे---४०.०---२०.४

‎जळगाव---३८.५---२५.०

‎जेऊर---४०.५---२१.५

‎कोल्हापूर---३७.७---२३.४

‎महाबळेश्‍वर---३२.३---१७.३

मालेगाव---४१.८---२४.२

‎नाशिक---३६.९---२३.१

‎निफाड---३८.५---२२.५

‎सांगली---३८.७---२३.२

‎सातारा---३९.०---२१.४

‎सोलापूर---४१.३---२६.६

‎सांताक्रूझ---३३.७---२८.९

अलिबाग---३५.९---निरंक

डहाणू---३५.६---२६.०

‎रत्नागिरी---३३.६---२५.६

‎छत्रपती संभाजीनगर---३८.८---२३.९

‎धाराशिव---४०.६---२४.१

‎परभणी---४१.४---२४.०

‎परभणी (कृषी)---४०.१---२२.३

‎अकोला---४१.६---२४.९

अमरावती---निरंक---२८.०

‎‎भंडारा---३७.०---२२.४

बुलडाणा---३८.५---२२.४

‎ब्रह्मपुरी---४०.२---२१.६

‎चंद्रपूर---४०.०---२३.२

‎गडचिरोली---३८.२---२२.६

‎गोंदिया---३७.१---१७.५

‎नागपूर---३८.४---२१.०

‎वर्धा---३८.५---२३.६

‎वाशीम---३९.८---निरंक

‎यवतमाळ---४०.२---२४.०

‎सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२०.४---४१.८

‎मराठवाडा---२२.३---४१.४

‎पश्‍चिम महाराष्ट्र---१७.३---४१.३

‎उत्तर महाराष्ट्र---१९.५---४३.२

‎कोकण---२५.६---३५.९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT