Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भातील तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील बहुतांशी भागात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज

Weather Forecast : हवामान विभागाने विदर्भातील तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा दिला. तर आज आणि उद्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तसेच उद्यापासून काही भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : हवामान विभागाने विदर्भातील तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा दिला. तर आज आणि उद्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तसेच उद्यापासून काही भागात पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने राज्यात उद्यापासून मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज दिला. तर आज मराठवड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड तर विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. तर उद्या नांदेड, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला.तर उद्या सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नाशिक, मालेगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

रविवारी विदर्भातील वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

तसेच रविवारी मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्यात तसेच जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. यासोबतच खानदेशसह नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली भागातही पावसाचा अंदाज देण्यात आला. 

सोमवारी हवामान विभागाने विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच विदर्भातील इतर जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मंगळवारीही विदर्भष मराठवाडा, खानदेश आणि खानदेशसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT