Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भात गारपीटीचा अंदाज; राज्यातील विविध भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Weather Update : हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या अनेक भागात पावसासाठी पोषक हवामान निर्मिती होत आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. तर उन्हाचा चटकाही कायम राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 

हवामान विभागाने आज भंडारा, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीटीचा इशारा दिला. तर काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज दिला. तसे यावेळी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

तर गोंदीया, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात ठिकाणी गारपीटीचा येलो अलर्ट दिला. तसेच परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. 

उद्या अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघरगर्जेसह गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिला. तर सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडिचिरोली, गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.

तसेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीनही दिवशी कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

Zilla Parishad Seizure Action: यवतमाळ जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की

Revenue Communication Initiative: ‘शेतकरी हक्क जागर, शेतकऱ्यांसाठी महसूल संवाद ’

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT