Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात थंडी कमी होण्याची शक्यता

Cold Weather : आज (ता. ३) राज्याच्या किमान तापमानात आणखी वाढ होत थंडी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. आज (ता. ३) राज्याच्या किमान तापमानात आणखी वाढ होत थंडी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. २) पंजाबमधील अमृतसर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, सिक्कीम, पश्चिम बंगालमध्ये किमान तापमान ७ ते १० अंशांदरम्यान आहे. हिमाचल प्रदेश, उत्तरखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेशात गारपीट, दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

थंडी आणखी कमी होण्याची शक्यता

राज्याच्या तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडी कायम असून, उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ३) किमान तापमानात वाढ होण्याची, तसेच थंडी आणखी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.० (१२.६), धुळे २८.५ (१२.०), जळगाव ३१.१ (१२.८), कोल्हापूर २९.७ (१५.६), महाबळेश्वर २३.५ (१२.०), मालेगाव २९.२ (१४.६), नाशिक २८.० (१३.४), निफाड २९.० (९.२), सांगली ३०.५ (१३.९), सातारा २९.७ (१३.५), सोलापूर ३४.०(१६.६), सांताक्रूझ २९.२ (१८.९), डहाणू २९.१ (१८.४), रत्नागिरी ३०.५ (१७.६),

छत्रपती संभाजीनगर २९.४ (१५.४), नांदेड ३१.४ (१६.२), परभणी ३१.४ (१५.५), अकोला ३२.० (१४.८), अमरावती ३०.६ (१६.५), बुलडाणा २९.० (१५.८), ब्रह्मपुरी ३१.४ (१९.१), चंद्रपूर ३१.० (१७.८), गडचिरोली २९.६ (१४.२), गोंदिया २९.६ (१६.२), नागपूर ३०.१(१७.४), वर्धा ३१.५(१७.४), वाशीम ३१.६ (१३.६), यवतमाळ ३२.५ (१४.७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT