Summer Heat  Agrowon
हवामान

Summer Heat : उन्हाच्या झळा ठरताहेत तापदायक

पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असून, जळगाव, धुळे, अकोला, वर्धा येथे तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे.

Team Agrowon

Weather Update Pune पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका (Heat) पुन्हा वाढला आहे. राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असून, जळगाव, धुळे, अकोला, वर्धा येथे तापमानाचा पारा (Temperature) चाळीशीपार गेला आहे.

आज (ता. १०) दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाची ताप वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर धुळे आणि जळगाव येथे ४१ अंश, तर वर्धा येथे ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. किमान तापमानात वाढ कायम असून, उन्हाच्या चटक्या बरोबरच ढगाळ हवामानामुळे उकाड्यातील वाढ झाली आहे.

तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि खंडित वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरापासून दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

आज (ता. १०) दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाची शक्यता आहे.

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.८ (२४.२), जळगाव ४१.० (२७.५), धुळे ४१.० (-), कोल्हापूर ३४.१ (२२.०), महाबळेश्वर २५.७ (१९.४), नाशिक ३६.५ (२३.४),

निफाड ३६.६ (२४.०), सांगली ३४.२ (२२.९), सातारा ३३.७ (२२.४), सोलापूर ३८.४ (२३.४), सांताक्रूझ ३३.४ (२७.४), डहाणू ३३.९ (२६.१), रत्नागिरी ३४.३ (२६.३),

छत्रपती संभाजीनगर ३८.० (२३.४), नांदेड ३९.८ (२६.२), धाराशिव ३५.३ (२३.२),

परभणी ३९.० (२३.८), अकोला ४२.० (२६.५), अमरावती ३९.८(२४.९), बुलढाणा ३७.८ (२६.५), ब्रह्मपूरी ३८.२ (२६.०),

गडचिरोली ३९.४(२४.४), गोंदिया ३८.२ (२४.५), नागपूर ३९.० (२४.६), वर्धा ४०.०(२१.०), वाशीम ३७.० (-), यवतमाळ ३९.० (२५.०).

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र, : सातारा, सांगली, कोल्हापूर.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंघावणार

आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, मंगळवारी (ता. ९) ठळक कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली होती.

या प्रणालीची तीव्रता वाढत असून, आजपर्यंत (ता. १०) अंदमान बेटांजवळ चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. ही वादळी प्रणाली उत्तरेकडे सरकून बांग्लादेश, म्यानमारच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT