Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यात उन्हाचा चटकाही कायम; पावसाचा जोर वाढणार

Weather Update : आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून वादळी पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्याला विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात तर खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच उद्यापासून म्हणजेच रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर उद्या आणि परवा विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT