Weather Forecast  Agrowon
हवामान

Weather Forecast : वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Monsoon Rain Update : विदर्भाच्या काही भागांसह उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

अमोल कुटे

Pune News : विदर्भाच्या काही भागांसह उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १२) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

जोरदार पावसासह मोसमी वाऱ्यांची राज्यात प्रगती सुरू आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये बीड, धाराशिव, जालना, लातूर, बुलडाणा, जळगाव आणि रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. उर्वरित राज्यातही वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीनी हजेरी लावली आहे.

मंगळवारी (ता. ११) दुपारनंतर राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली होती. आज (ता. १२) कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) :

कोकण :

मुंबई शहर : कुलाबा ५२.

रायगड : अलिबाग ५४, म्हसळा ४९, मुरूड १५४.

रत्नागिरी : दापोली ४१.

मध्य महाराष्ट्र :

नगर : नेवासा ४०, शेवगाव ४९.

जळगाव : भाडगाव ५०, दहीगाव १३६, एरंडोल ४६, जळगाव ९३, जामनेर ७५.

पुणे : बारामती ४०, सासवड २६.

सांगली : कवठे महांकाळ ३९.

सातारा : महाबळेश्‍वर ३२.

सोलापर : बार्शी ३६.

मराठवाडा :

बीड : अंबाजोगाई ७७, धारूर ३२, परळी वैजनाथ ४६.

छत्रपती संभाजीनगर : पैठण ४६.

धाराशिव : भूम ८४, धाराशिव ६३, कळंब ३५, लोहारा १११, तुळजापूर ३०, उमरगा १०५, वाशी ४१.

जालना : भोकरदन ३९, घनसांगवी ५२, जाफराबाद ३७, परतूर ६२.

लातूर : अहमदपूर ४१, औसा १०१, चाकूर ८७, लातूर ४८, निलंगा १२९, रेणापूर ९५, शिरूर

अनंतपाळ ९६.

नांदेड : भोकर ५९.

परभणी : मानवत ४८, सेलू ३५, सोनपेठ ५९.

विदर्भ :

अकोला : अकोला ३२.

बुलडाणा : देऊळगाव राजा ४६, लोणार ३३, सिंदखेड राजा ४४.

वाशीम : रिसोड ३८.

मध्यम पावसाची शक्यता :

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे :

मुरूड १५४ (जि. रायगड), दहीगाव १३६ (जि. जळगाव), लोहारा १११, उमरगा १०५ (जि. धाराशिव), निलंगा १२९, औसा १०१, (जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती

Rain Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता

MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही

Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

NDRF Assistance Norms: एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत केंद्र सरकारकडून वाढ; आपत्तीग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT