Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : पावसानंतर धुक्याचे ‘राज्य’

Foggy Weather : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीने तडाखा दिल्यानंतर दोन दिवसांपासून राज्यात धुक्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीने तडाखा दिल्यानंतर दोन दिवसांपासून राज्यात धुक्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. दाट धुक्यामुळे काही अंतरावरील दिसनेही अशक्य होत असून, मोठ्या प्रमाणावर दव पडत आहे.

आज (ता. ३) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पाऊस सुरूच आहे. शनिवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर, धुळे, परभणी जिल्ह्यासह राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

आज (ता.३) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ कायम असून, कमाल तापमानातील घट, किमान तापमानातील वाढ टिकून आहे.

राज्यात गेली काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुके पसरल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

शनिवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.९ (१६.६), जळगाव २८.६(१९.०), कोल्हापूर - (२१.६), महाबळेश्वर २५.६ (१६.१), नाशिक २९.१ (१९.२), निफाड २८.२ (१८.५), सांगली २८.९ (२१.९), सातारा ३१.५ (१८.९), सोलापूर ३२.०(१९.८), सांताक्रूझ ३१.० (२१.२), डहाणू २९.० (२१.८), रत्नागिरी ३२.५ (२२.६),

छत्रपती संभाजीनगर २८.४ (२०.४), नांदेड २९.६ (१९.८), परभणी २५.६ (१९.६), अकोला २४.७ (२०.२), अमरावती २५.८ (१९.५), बुलडाणा २५.४ (१८.६), ब्रह्मपुरी ३२.४ (१९.६), चंद्रपूर ३१.२(१८.०), गडचिरोली ३०.४ (१७.८), गोंदिया ३०.० (१८.६), नागपूर २८.०(१९.८), वर्धा २७.०(१९.८), वाशीम २९.४(१८.४), यवतमाळ २९.७ (१८.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT