Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather : तापमानात चढ-उतार शक्य

Maharashtra Winter Update : आज (ता. १६) दक्षिण कोकणासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढल्याने थंडीची चाहूल लागली आहे. यातच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. १६) दक्षिण कोकणासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

मनारचे आखात आणि श्रीलंका किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ देखील आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. १५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी किमान तापमान १५ अंश आणि त्यापेक्षा खाली आहे.

कोकणात कमाल तापमान तापदायक ठरत आहे. शुक्रवारी (ता. १५) सांताक्रूज येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १६) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ-घट होण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.५ (१९.६), अहिल्यानगर ३१.९ (१९.५), धुळे (११), जळगाव ३२.४ (१७), कोल्हापूर ३०.८ (२२.२), महाबळेश्‍वर २६.४ (१८.२), नाशिक ३०.४ (१६.६), निफाड ३० (१५.८), सांगली ३२ (२३), सातारा ३१.४ (२२.५), सोलापूर ३२ (२३.४),

सांताक्रूझ ३६.८ (२२.६), डहाणू ३४.६ (२२.२), रत्नागिरी ३४.८ (२५.२), छत्रपती संभाजीनगर ३१.३ (१७.९), धाराशिव (२१.४), परभणी ३२.१ (१८), परभणी कृषी विद्यापीठ ३१.५ (१४.६), अकोला ३३.६ (१७.३), अमरावती ३३.२ (१६.९), बुलडाणा ३१ (१८), ब्रह्मपुरी ३३.८ (१६), चंद्रपूर ३१ (१५.४), गडचिरोली ३२.६ (१५), गोंदिया ३१ (१४.६), नागपूर ३१.८ (१५.७), वर्धा ३१ (१६.५), वाशीम ३४.६, यवतमाळ ३१ (१६.५).

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

विजांसह पावसाची शक्यता :

सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT