Weather Update  Agrowon
हवामान

Weather Forecast News : ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार

Latest Weather Update : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्याने तडाखा दिल्याने उन्हाची ताप, उकाडा वाढला आहे.

अमोल कुटे

Pune Weather News : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्याने तडाखा दिल्याने उन्हाची ताप, उकाडा वाढला आहे. यातच दक्षिण कोकणात पावसाने हजेरी लावली असून, ढगाळ हवामान झाल्याने कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. आज (ता. १७) सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्वोत्तर भारतातील राज्ये आणि दक्षिण भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहूतांश भागातून मॉन्सून परतला आहे. मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण झाल्याने उद्यापर्यंत (ता. १८) पूर्वोत्तर राज्यासह, दक्षिण आणि पूर्व भारतातील आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. तामिळनाडू किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका तापदायक ठरत असून, अनेक ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३५ अंशांच्या पुढे आहे. सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, वाशीम येथे तापमान ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

रविवारी (ता. १५) पावसाने हजेरी लावल्याने कणकवली येथे सर्वाधिक ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर चिपळूण ३०, मुलदे, वैभववाडी येथे २० मिलीमीटर, तर दोडामार्ग, सुधागड पाली येथे १० मिलीमीटर पाऊस पडल्याने हवामान विभागाने म्हटले आहे. आज (ता. १७) तापमानातील चढ-उतार कायम राहून, ढगाळ हवामानाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.७, जळगाव ३६.८, कोल्हापूर ३२.४, महाबळेश्वर २६.९, नाशिक ३३.१, सांगली ३२.८, सातारा ३३.३, सोलापूर ३५.८, सांताक्रूझ ३४.६, डहाणू ३४.६, रत्नागिरी ३२.८, छत्रपती संभाजीनगर ३२.८, नांदेड ३४.६, परभणी ३५.१, अकोला ३७.०, अमरावती ३५.८, बुलडाणा ३४.४, ब्रह्मपूरी ३५.८, चंद्रपूर ३४.४, गडचिरोली ३४.४, गोंदिया ३४.४, नागपूर ३३.९, वर्धा ३५.०, वाशीम ३६.२, यवतमाळ ३५.७.

अरबी समुद्रात कमी दाबाची शक्यता

आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांच्या जवळ समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या चक्राकार वाऱ्यांमुळे उद्यापर्यंत (ता.१८) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. वायव्येकडे सरकताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

अकोला ३७.०, जळगाव ३६.८, वाशीम ३६.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT