Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानात चढ-उतार शक्य

Winter Update : उत्तरेकडील थंडीचा कडाका कमी झाला असतानाच, राज्यातही थंडी कमी-अधिक होत आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंडीचा कडाका कमी झाला असतानाच, राज्यातही थंडी कमी-अधिक होत आहे. मात्र राज्यात गारठा कायम असून, काही ठिकाणी तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. शनिवारी (ता. २३) हरियाणातील हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशामध्ये अनेक भागात किमान तापमान ६ ते १२ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय राज्यात धुके कायम आहे.

राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, कायम असल्याने विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. शनिवारी (ता. २३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, जळगाव आणि गडचिरोली येथे तापमान १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. आज (ता. २४) विदर्भासह राज्यात गारठा टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.१ (१२.५), धुळे २८.० (९.०), जळगाव २८.४ (९.८), कोल्हापूर ३०.६ (१७.३), महाबळेश्वर २६.५ (१५.०), नाशिक २६.८ (१३.२), निफाड २७.२ (११.२), सांगली ३०.४ (१५.६), सातारा ३१.७ (१४.०), सोलापूर ३२.६(१५.०), सांताक्रूझ ३२.३ (१९.६), डहाणू ३०.७ (१९.५), रत्नागिरी ३५.० (२०.३),

छत्रपती संभाजीनगर २९.२ (१२.५), नांदेड २८.८ (१४.२), परभणी ३०.० (१३.०), अकोला ३१.३ (१३.८), अमरावती २९.८ (१३.८), बुलढाणा २८.६ (१३.८), ब्रह्मपूरी २९.६ (१२.९), चंद्रपूर २८.४(११.८), गडचिरोली २८.६ (१०.०), गोंदिया २७.६ (१२.५), नागपूर २८.८(१३.८), वर्धा २९.०(१४.०), वाशीम - (११.८), यवतमाळ ३१.० (११.५).

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे : धुळे ९.०, परभणी (कृषी) ९.४, जळगाव ९.८, गडचिरोली १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT