Weather Update Agrowon
हवामान

Weather News : किमान तापमानात चढ-उतार शक्य

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. बुधवारी (ता. ६) दिवसभर आकाश ढगाळ असल्याने कमाल तापमानात घट होऊन गारठा जाणवत होता.

Team Agrowon

Minimum Temperature : पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. बुधवारी (ता. ६) दिवसभर आकाश ढगाळ असल्याने कमाल तापमानात घट होऊन गारठा जाणवत होता. आज (ता. ७) राज्याच्या किमान व कमाल तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

‘मिगजौम’ चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली असून, राज्यात ढगाळ हवामान व सकाळपासून धुक्याची दुलई असल्याने अनेक भागांत सूर्यदर्शन झाले नाही. ढगांच्या आच्छादनामुळे कमाल तापमानात वाढ झाली नाही. तर किमान तापमानात थोडीशी घट झाल्याचे दिसून आले.

बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमान २५ ते ३३ अंशांच्या दरम्यान होते. किमान तापमानातील वाढ कायम असून, थंडी गायब झाली आहे. महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १५.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८ (१८.५), जळगाव २७.७ (१७.२), कोल्हापूर २९.१ (२०), महाबळेश्‍वर २३.२ (१५.२), नाशिक २५.२ (१९), निफाड २९.६ (१८), सांगली (१८.९), सातारा २९.८ (१९.४), सोलापूर ३१.४ (२१), सांताक्रूझ ३३.५ (२३.३),

डहाणू २९.९ (२१.२), रत्नागिरी ३४.१ (२२.६), छत्रपती संभाजीनगर २८ (१९.२), नांदेड (१९.६), परभणी २७.३ (१७), अकोला २८.५ (२०.८), अमरावती २६.४ (१८), बुलडाणा २७.२ (१८.८), ब्रह्मपुरी २४.६ (१८.५), चंद्रपूर २९.६ (१७), गडचिरोली २६ (१८.६), गोंदिया २३ (१७.२), नागपूर २५.६ (१९.२), वर्धा २५.८ (१८.९), वाशीम २६.८ (१६.८), यवतमाळ २९.५ (१७.५).


चक्रीवादळाची तीव्रता ओसरली
बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ तीव्र चक्रीवादळ मंगळवारी (ता. ५) दुपारी आंध्र प्रदेशातील बपतलाजवळ धडकले.

जमिनीवर येताच चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, बुधवारी तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. त्यापासून दक्षिण तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT