Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather: किमान तापमानात चढ-उतार शक्य

Maharashtra Cold Wave: किमान तापमानात घट झाल्याने राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. मात्र अद्यापही थंडी कमीच आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे.

अमोल कुटे

Pune News: किमान तापमानात घट झाल्याने राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. मात्र अद्यापही थंडी कमीच आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात १५० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रवातांमुळे थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. मंगळवारी (ता. २१) मध्य प्रदेशच्या मंडला येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही थंडी-कमी अधिक होत असून, धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. किमान तापमानाचा पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. मंगळवारी (ता. २१) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे आणि निफाड येथेही तापमान १० अंशांच्या खाली होते.

कोकणात उन्हाचा चटका कायम असल्याने मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान होण्याची शक्यता असल्याने किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---कमाल---किमान

पुणे---३१.७---१२.७

अहिल्यानगर---३०.८---१०.५

धुळे---३०---८.६

जळगाव---३१.३---१२.७

जेऊर---३२.५---११.५

कोल्हापूर---३१.१---१८.३

महाबळेश्‍वर---२७.९---१४.६

मालेगाव---२८.०---१३.४

नाशिक---३०.६---१२.६

निफाड---२९.४---९.५

सांगली---३२.८---१६.४

सातारा---३२.०---१४.२

सोलापूर---३४.०---१५.९

सांताक्रूझ---३५.४---१८.४

डहाणू---२९.५---१७.३

रत्नागिरी---३३.५---१९.४

छत्रपती संभाजीनगर---३१.८---१३.१

धाराशिव---३०.०---१३.४

परभणी---३१.४---१२.४

परभणी (कृषी)---२९.५---७.९

अकोला---३२.८---१३.७

अमरावती---३१.६---१३.९

भंडारा---३०.०---१३.६

बुलडाणा---२९.६---१४.०

ब्रह्मपुरी---३४.२---१२.१

चंद्रपूर---३०.४---निरंक

गडचिरोली---३१---१२.४

गोंदिया---२९.८---१३.४

नागपूर---३१---१२.२

वर्धा---३१.५---१३.८

वाशीम---३१.६---१६.२

यवतमाळ---३०.७---१२.२

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

परभणी (कृषी) ७.९, धुळे ८.६, निफाड ९.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT