Maharashtra Cold  Agrowon
हवामान

Maharashtra Cold: थंडीत चढ उतार कायम ; तापमानात वाढ, उत्तर भारतात किमान तापमानातील वाढ कायम

Weather Update : उत्तरेकडील थंडीत चढ उतार सुरु आहेत. किमान तापमानातही वाढ झाली. याच परिणाम राज्यातील वातावरणावर दिसून येत आहे.

अनिल जाधव

Pune News : उत्तरेकडील थंडीत चढ उतार सुरु आहेत. किमान तापमानातही वाढ झाली. याच परिणाम राज्यातील वातावरणावर दिसून येत आहे. उत्तरेकडून थंडी वारे वाहत नसल्याने राज्यातही थंडी कमी झाली. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा १४ ते २४ अंशादरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातील बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ झाली. मध्य प्रदेशच्या काही भागासह उत्तर प्रेदशातील बहुतांशी भागातील किमान तापमान १० ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. या भागात सरासरीपेक्षा २ ते ४ अंंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर पंजाबमधील अमृतसर येथे देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. येथे ४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. याचवेळी पंजाबच्या बहुतांशी भागात आणि राजस्थानच्या काही भागात दाट ते अतिदाट धुक्याची चादर होती.

राज्याच्या तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. निफाड, धुळ्यासह किमान तापमानाचा पारा १० अंशाच्या पुढे गेला असून, किमान तापमान १० ते २२ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. आजही किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

Crop Insurance Compensation: विमा भरपाईतून वगळलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश

National Values: स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल ते करणे नव्हे!

Onion Pest Management: कांदा पिकातील कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Jalyukt Shivar 2.0: जलसंधारणाच्या कामांना गती द्या; प्रत्येक कामाचे जिओटॅगिंग अनिवार्य : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT