Rain update Agrowon
हवामान

Return Monsoon: अखेर माॅन्सूनचा निरोप; काही भागात हलक्या पावसाचा अंदाज

Rain Update : हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Rain Alert : माॅन्सूनने अखेर देशाचा निरोप घेतला. संपूर्ण देशातून माॅन्सूनने माघार घेतली. तर बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होत आहे. तसेच हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज राज्यातील पाच जिल्ह्यांमधील काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. उद्याही याच जिल्ह्यांमध्ये विजांसह काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज आहे.

माॅन्सूनने आज देशाचा निरोप घेतला. आज म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी माॅन्सूनने संपूर्ण देशातून माघार घेतली. आता आग्नेय माॅन्सून पुढील ७२ तासांमध्ये दक्षिण द्वापकल्पात सक्रीय होण्याची शक्यता आहे. मध्य अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. याचे पुढील २४ तासांमध्ये ठळक कमी दाब क्षेत्रात रुपांतर होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या मध्य भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT