Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान

Rain Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता

Team Agrowon

Weather News : पुणे : राज्याच्या कमाल तापमानात घट झाली असली तरी, उन्हाची ताप आणि उकाडा कायम आहे. विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे. आज (ता. २८) उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे.

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान (Favorable Weather) होत असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, अकोला, नांदेड येथे कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे होते.

उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३४ ते ४१ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानात घट झाली आहे. उन्हाचा चटका आणि दमट हवामानामुळे उकाडा जाणवत आहे.

वायव्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून उत्तर मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून ओडिशापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आज (ता. २८) उष्ण व दमट हवामानामुळे राज्यात चटका आणि उकाडा कायम राहणार आहे. राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३५.९ (२२.७), जळगाव - (२६.७), धुळे ४०.५ (-), कोल्हापूर ३४.७ (२२.९), महाबळेश्वर २८.९ (१५.९), नाशिक ३४.३ (२२.६), निफाड ३५.८ (२४.०), सांगली ३७.३ (२२.६), सातारा ३५.६ (२२.५), सोलापूर ३९.७ (२४.९), सांताक्रूझ ३४.१ (२८.२), डहाणू ३५.६ (२९.०), रत्नागिरी ३४.१ (२५.२), छत्रपती संभाजीनगर ३७.६ (२२.२), नांदेड ४१.२ (२७.४), परभणी ४०.० (२६.०),

अकोला ४१.० (२७.०), अमरावती ४०.६(२५.३), बुलडाणा ३८.० (२५.०), ब्रह्मपुरी ४०.८ (२४.६), चंद्रपूर ४२.२(२६.८), गोंदिया ४०.५ (२४.२), नागपूर ४०.८ (२४.६), वर्धा ४१.०(२६.६), वाशीम ४०.४(२४.०) यवतमाळ ३९.५ (२६.०).

मॉन्सूनची प्रगती होईना
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) १९ मे रोजी दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाले. त्यानंतर तब्बल आठवडाभरापासून मॉन्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती झालेली नाही. शनिवारी (ता. २७) मॉन्सूनची स्थिती जैसे थे आहे.

पुढील दोन दिवसांत दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा आणखी काही भाग, तसेच अंदमान बेटांच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
चंद्रपूर ४२.२, नांदेड ४१.२, अकोला ४१, वर्धा ४१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT