Weather  Agrowon
हवामान

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

Vidarbha Weather Forecast : राज्यात पावसाची उघडीप राहणार असून, कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : वादळी पावसाचे ढग दूर झाल्याने राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘डाना’ चक्रीवादळामुळे पूर्व भारतात पावसाची शक्यता असून, उद्यापासून (ता. २६) विदर्भात पावसाची शक्यता आहे. आज (ता. २५) राज्यात पावसाची उघडीप राहणार असून, कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कमी होऊ लागला आहे. मात्र वादळी पावसाने उघडीप देताच कमाल तापमानात वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३५.८ अंश तापमानाची नोंद झाली. तसेच सोलापूर आणि ब्रह्मपुरी येथे ३५ अंश तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाची उघडीप मिळाल्यानंतर महिना अखेरपासून राज्याच्या उत्तर भागात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. आज (ता. २५) राज्यात पावसाची उघडीप मिळण्यासह कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. तर उद्या (ता. २६) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३३.७, अहिल्यानगर ३१.९, जळगाव ३३.८, कोल्हापूर ३१.१, महाबळेश्वर २८.८, मालेगाव ३१.६, नाशिक ३२.७, निफाड ३१.८, सांगली ३२.१, सातारा ३२.१, सोलापूर ३५.६, सांताक्रूझ ३५.८, डहाणू ३४.३, रत्नागिरी ३३.४, छत्रपती संभाजीनगर ३२.७, बीड ३०.७, परभणी ३२.६, अकोला ३४.५, अमरावती ३३.८, भंडारा ३०, बुलडाणा ३०.८, ब्रह्मपुरी ३५.१, चंद्रपूर ३३.८, गडचिरोली ३३.४, गोंदिया ३३.८, नागपूर ३४.२, वर्धा ३३.८, वाशीम ३३, यवतमाळ ३२.७.

३४ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : सांताक्रूझ ३५.८, सोलापूर ३५.६, ब्रह्मपुरी ३५.१, अकोला ३४.५, डहाणू ३४.३, नागपूर ३४.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT