Rain Update  Agrowon
हवामान

Weather Update : पावसासाठी पोषक हवामान, थंडी झाली कमी

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडी कमी झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडी कमी झाली आहे. आज (ता. ३) किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातील राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढत असून, मंगळवारी (ता. २) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये अनेक भागांत किमान तापमान ६ ते ९ अंशांच्या दरम्यान होते. तर पंजाब हरियाना, राजस्थानसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागांत थंडीची लाट कायम होती.

किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. मंगळवारी (ता. २) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ३) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.५ (१३.६), धुळे ३१.५ (१२.५), जळगाव ३०.४ (१५.२), कोल्हापूर २९.९ (१७.८), महाबळेश्‍वर २७.५ (१५), नाशिक ३०.४ (१४.५), निफाड २९ (१२.८), सांगली २९.८ (१६.८), सातारा ३०.७ (१४.१), सोलापूर ३२ (१७), सांताक्रूझ ३१.९ (१९.८), डहाणू २९.९ (१९.७), रत्नागिरी ३१.५ (२३),

छत्रपती संभाजीनगर २९.२ (१४.९), नांदेड - (१६.८), परभणी २९.९ (१६.१), अकोला ३०.९ (१६.४), अमरावती २९.६ (१५.३), बुलडाणा २९.४ (१६.७), ब्रह्मपुरी ३२.२ (१४.३), चंद्रपूर २८.८ (१४.४), गडचिरोली ३०.२ (१४.६), गोंदिया २७.८ (१४), नागपूर २८.८ (१४.४), वर्धा २९ (१४.९), वाशीम ३०.२ (१५.६), यवतमाळ ३०.५ (१६.५).

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय

आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. ही प्रणाली आज (ता. ३)आणखी तीव्र होणार आहे. उत्तरेकडे सरकणारे कमी दाबाचे क्षेत्र ठळक होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT