Winter Weather Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात किमान तापमानात घट होण्याचे संकेत; थंडीचा जोर वाढणार

Winter Weather Forecast : किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा, तर उद्यापासून (ता. २४) किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : किमान तापमानात घट होत असल्याने गारठा पुन्हा वाढू लागला आहे. मात्र अद्यापही थंडी कडाका कमीच असल्याचे चित्र आहे. आज (ता. २३) किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा, तर उद्यापासून (ता. २४) किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. वायव्य भारतात १४५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रवातांमुळे थंडी पुन्हा वाढू लागली आहे. बुधवारी (ता. २२) पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात थंडीचा कडाका कमी झाला असून, किमान तापमान कमी-अधिक होत आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. बुधवारी (ता. २२) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे आणि निफाड येथेही तापमान १० अंशांच्या खाली होते. तर राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान पुन्हा १५ अंशांच्या खाली आले आहे.

उन्हाचा चटका कमी-अधिक होत असतानाच, बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे ३५.१ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होण्याची शक्यता असली तरी उद्यापासून (ता. २४) आकाश पुन्हा निरभ्र होत किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---कमाल---किमान

पुणे---३२.४---१३.५

अहिल्यानगर---३१---निरंक

धुळे---३०---९.५

जळगाव---३१.४---१३

जेऊर---३३.५---१२.५

कोल्हापूर---३१.२---१७.५

महाबळेश्‍वर---२७.७---१५.४

मालेगाव---२७.८---निरंक

नाशिक---३२.१---१२.८

निफाड---२९---९.२

सांगली---३२.७---१५.४

सातारा---३२.२---१४

सोलापूर---३५.१---१४

सांताक्रूझ---३३.५---१८.३

डहाणू---२९.२---१८.१

रत्नागिरी---३३.५---१८.६

छत्रपती संभाजीनगर---३२---१४

धाराशिव---३०.७---१२.६

परभणी---३२.०---१२.९

परभणी (कृषी)---३०.५---८.५

अकोला---३३.१---१४.३

अमरावती---३२.४---१४.६

भंडारा---३०.८---१४.६

बुलडाणा---३०.६---१६

ब्रह्मपुरी---३५---१२.४

चंद्रपूर---३०.६---निरंक

गडचिरोली---३२.२---१३

गोंदिया---३०.२---१४

नागपूर---३१.६---१३

वर्धा---३१.७---१४

वाशीम---३२.६---१७.६

यवतमाळ---३१.०---१३.२

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

परभणी (कृषी) ८.५, निफाड ९.२, धुळे ९.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT