Weather Update Agrowon
हवामान

Weather Changes: तापमानातील तफावत वाढली: पहाटे गारठा, दुपारी उकाडा!

Temperature Fluctuation: बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३६.८ अंश, तर निफाड येथे नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अमोल कुटे

Pune News: कमाल तापमान पस्तिशीपार पोहोचले असताना, उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांखाली घसरला आहे. कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा अशी विषम स्थिती अनुभवायला मिळत आहे. बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३६.८ अंश, तर निफाड येथे नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. बुधवारी (ता. १२) राजस्थानच्या फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश तापमान नोंदविले गेले. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, वाशीम आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. वर्धा, अमरावती, यवतमाळ, जेऊर, चंद्रपूर, परभणी, नागपूर येथे पारा पस्तिशीपार आहे. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात तब्बल १५ ते २३ अंशांची तफावत दिसून येत आहे. आज (ता. १३) कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.८---१५.३

अहिल्यानगर---३४.२---१५.५

धुळे---३३---९.५

जळगाव---३३.२---१३.६

जेऊर---३५.२---१५.५

कोल्हापूर---३३.३---२०.६

महाबळेश्‍वर---२८.९---१७

मालेगाव---३४.८---१४.४

नाशिक---३३.२---१२.१

निफाड---३०.१---८

सांगली---३४.६---१६.६

सातारा---३४.६---१७.५

सोलापूर---३६.३---२१.६

सांताक्रूझ---३२.८---१६.५

डहाणू---२८.१---१६

रत्नागिरी---३३.१---२०.७

छत्रपती संभाजीनगर---३४.४---१६.४

धाराशिव---३३.४---१८.४

परभणी---३५.३---१८.९

परभणी (कृषी)---३४.५---१८.२

अकोला---३६.८---१९

अमरावती---३५.६---१६.३

भंडारा---३४.८---१८

बुलडाणा---३४.५---१९.८

ब्रह्मपुरी---३६---१९.४

चंद्रपूर---३५.४---निरंक

गडचिरोली---३४.६---१७.६

गोंदिया---३४.२---२०.५

नागपूर---३५---१६.४

वर्धा---३५.९---१८.४

वाशीम---३६---२२

यवतमाळ---३५.५---१८.२

३६ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ३६.८, सोलापूर ३६.३, ब्रह्मपुरी ३६, वाशीम ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT