Dana Cyclone Agrowon
हवामान

Dana Cyclone : बंगालच्या उपसागरात ‘डाना’ चक्रीवादळ

Cyclone Update : बंगालच्या उपसागरात ‘डाना’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनाऱ्याकडे झेपावत असलेली हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार आहेत.

Team Agrowon

Pune News : बंगालच्या उपसागरात ‘डाना’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनाऱ्याकडे झेपावत असलेली हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार आहेत. आज (ता. २४) रात्री उशिरा ते उद्या (ता.२५) पहाटे हे चक्रीवादळ पूरी आणि सागर बेटांदरम्यान किनाऱ्याला धडकण्याचा शक्यता आहे.

जमिनीवर येताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर प्रभाव पडणार नाही.पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील मंगळवारी (ता. २२) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली होती. ही प्रणाली वायव्य दिशेकडे सरकताना तीव्र झाली असून, बुधवारी (ता. २३) चक्रीवादळात रूपांतरण होऊन, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकू लागली आहे.

ही प्रणाली ओडिशाच्या परादीपपासून आग्नेयकडे ४९० किलोमीटर, धामरापासून ५२० किलोमीटर आग्नेयकडे, तर पश्चिम बंगालच्या सागर बेटापासून ५७० किलोमीटर आग्नेयकडे होती. वायव्य दिशेकडे सरकून किनाऱ्याकडे येताना ‘डाना’ वादळाची तीव्रता वाढणार आहे. आज (ता. २४) सायंकाळपर्यंत ते उद्या (ता. २५) पहाटे हे तीव्र चक्रीवादळ ओडिशाच्या पुरी आणि सागर बेटाजवळ असलेल्या धामराजवळ जमिनीवर येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ओडिशा, पश्चिम बंगाल किनाऱ्यांलगत ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच १ ते २ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.खबरदारी म्हणून मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता आहे. समुद्र खवळल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT