हवामान

Cyclone Biporjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत; मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता

Cyclone Update : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, आज (ता. ७) अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंगावण्याचे संकेत आहेत.

Team Agrowon

Weather Update : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, आज अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंगावण्याचे संकेत आहेत.

हे संभाव्य चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्याला समांतर उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. यातच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची अर्थात मॉन्सूनची वाटचाल जैसे थे आहे. या वादळामुळे मॉन्सूनच्या आगमनावर व पुढील वाटचालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील 'मोचा' चक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात वादळी प्रणाली तयार होऊ लागली आहे. मंगळवारी केरळजवळच्या समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. ही प्रणाली गोव्यापासून ९५० किलोमीटर नैर्ऋत्येकडे, मुंबईपासून ११०० किलोमीटर दक्षिणेकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून, ११९० किलोमीटर दक्षिणेकडे होती. उत्तरेकडे सरकत असलेली ही प्रणाली आणखी तीव्र होत असून, आज पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत.

किनाऱ्याला समांतर दिशेने जाणाऱ्या या चक्रीवादळाची तीव्रता देखील वाढणार आहे. या चक्री वादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच ८ जून पासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा असून, किनारपट्टीवर वादळी पावसाची शक्यता आहे. ८ ते १० जून या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मॉन्सूनने अरबी समुद्रातील प्रगती करत शुक्रवारी लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंका, संपूर्ण कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली होती. यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले आहे.

साधारणतः ८ जूनपर्यंत मॉन्सून अरबी समद्रात येण्याची शक्यता हवामान विभागाने यापुर्वीच वर्तविली आहे. अरबी समुद्रातील संभाव्य चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल थबकली आहे. कमी दाब क्षेत्राने केरळजवळील ढग खेचून घेतले आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती नसून, या चक्रीवादळीच्या वाटचालीवरच मॉन्सूनचे केरळातील आगमन व पुढील प्रगती ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT