Mocha Cyclone Agrowon
हवामान

Mocha Cyclone : बंगालच्या उपसागरात घोंघावतंय ‘मोचा’ चक्रीवादळ

India Weather Update : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) तीव्रता वाढून बुधवारी (ता. १०) रात्री ‘मोचा’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.

Team Agrowon

Pune Weather News : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) तीव्रता वाढून बुधवारी (ता. १०) रात्री ‘मोचा’ चक्रीवादळाची (Mocha Cyclone ) निर्मिती झाली आहे.

बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत असलेली वादळी प्रणाली आणखी तीव्र होत असून, रविवारी (ता. १४) दुपारपर्यंत किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव जाणवणार नाही.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून, बुधवारी (ता. १०) सकाळी वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) तयार झाली. ही प्रणाली पोर्ट ब्लेअरपासून ५२० किलोमीटर नैॡत्येकडे, बांगलादेशाच्या कॉक्सबाजार पासून १४१० किलोमीटर दक्षिणेकडे, म्यानमारच्या सिट्वेपासून १३०० किलोमीटर नैॡत्येकडे होती.

रात्री या प्रणालीचे ‘मोचा’ चक्रीवादळात रुपांतरण झाले. या वादळाची तीव्रता वाढून उपसागरात आज (ता. ११) अतितीव्र चक्रीवादळ घोंघावणार आहे. रविवारी (ता. १४) दुपारी ही प्रणाली बांगलादेशाच्या कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या ‘क्याउक्प्यू’ दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

‘मोचा’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

या चक्रीवादळामुळे अंदमान निकोबार बोटसमुह, ईशान्य भारतातील त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, मणिपूर, पूर्व अरुणाचल प्रदेश व दक्षिण आसाम राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ताशी ११० ते १३० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हे वादळ किनारपट्टीला धडकणार आहे. तसेच समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT