Fengal Cyclone Agrowon
हवामान

Fengal Cyclone : `फेंगल` चक्रीवादळ काही तासात किनारट्टीला धडकणार; राज्यातही ३ दिवस पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. मात्र सोमवार, मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : फेंगल चक्रीवादळ काही तासांमध्ये तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. मात्र किनारी भागात सकाळपासून जोऱ्याचे वारे आणि जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. मात्र सोमवार, मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

फेंगल चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून किनाऱ्याकडे झेप घेत आहे. सध्या हे चक्रीवादळ नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळ १३ किलोमीटर प्रतितास वेगाने किनाऱ्याकडे वाटचाल करत आहे. चक्रीवादळ सध्या पुद्दुचेरीपासून पूर्वेला १२० किलोमीटर तर चेन्नईपासून अग्नेयला ११० किलोमीटर अंतरावर आहे.

फेंगल पश्चिमेकडे वाटचाल करत असून काही तासांमध्ये उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यावेळी ७० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशात पावसाचा अंदाज आहे. आज उत्तर तमिळनाडू आणि रायलसिमा भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली.

तसेच उद्या तमिळनाडूच्या अंतर्गत भागात आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. २ आणि ३ डिसेंबरला तमिळनाडू आणि रायलसिमा भागात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

राज्यातही सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सोमवारी सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. मंगळवारी सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर बुधवारी सिंधुदूर्ग रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

तर उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडी कायम आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात ६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान ७ अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यात इतरही काही ठिकाणी तापमान १० अंशाच्या दरम्यान होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT